आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राखी सावंत लवकरच आठवलेंच्या आरपीआय पक्षात प्रवेश करणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आयटम गर्ल व बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत ही लवकरच रामदास आठवले यांच्या रिपब्लकीन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा असल्याचे राखीने खासदार रामदास आठवले यांना सांगितले. राखीने काल आठवलेंची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात भेट घेतली. त्यावेळी याबाबत चर्चा झाली.
राखी सावंत ही एका पोलिस हवालदाराची मुलगी आहे. लहानपणापासून तिने संघर्ष पाहिला आहे. एवढेच नव्हे तर तथाकथित उच्चभ्रू समाजाने सामावलेल्या बॉलिवूडमध्येही या मराठमोळ्या दलित मुलीला मोठा संघर्ष करावा लागला. ब-या-वाईट अनेक बाबींचे चटके सोसल्यानंतर राखीने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने भाजपात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपमधून तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने स्वतंत्र पक्ष स्थापून लोकसभा निवडणूक लढविली. मात्र, राखीचा दारूण पराभव झाला. त्यामुळे राखीने काही दिवसातच आपल्या पक्षाचे विसर्जन केले. राजकारणाची हवा डोक्यात गेलेल्या राखीने शुक्रवारी आरपीआय नेते खासदार आठवले यांची भेट घेतली व पक्षात प्रवेश करण्याबाबत चर्चा केली. याबाबत आठवले व राखी सावंत पुढील आठवड्यात निर्णय घेतील असे कळते.