आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवले, काकडे यांचे राज्यसभेचे स्वप्न पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यसभेच्या राज्यातील सात जागांसाठी मंगळवारी अखेरच्या दिवशी सातच अर्ज आल्याने या सातही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यात भाजपकडून असलेले रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, अपक्ष बिल्डर संजय काकडे यांचेही स्वप्न पूर्ण झाले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे हुसेन दलवाई, मुरली देवरा, शिवसेनेचे राजकुमार धूत यांचीही बिनविरोध निवड झाली.
आठवले यांनी मंगळवारी अर्ज सादर केला. लातूरसह लोकसभेच्या सात जागांची ‘रिपाइं’ची मागणी असून यापैकी तीन जागा तरी मिळतीलच असे आठवले या वेळी म्हणाले. महायुतीच्या 33 जागा येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.