आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम मशीनमधून डेबिट झालेले पैसे सात दिवसांत परत करण्याचे बँकांना आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एटीएम म्हटले की झटपट पैसे असे समीकरणच बनले आहे. मात्र अनेकदा एटीएम मशीनमध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण करून देखील पैसे मिळत नाहीत तेव्हा ग्राहकांना मोठा मनस्ताप होतो. आपलेच पैसे परत मिळण्यासाठी मग बँकेचे खेटेही मारावे लागतात. एटीएम मशीन्सचा वापर करणा-यांचा हा त्रास लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा बँकाना दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

बँकांमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि हवे तेव्हा पैसे काढता यावे या उद्देशाने देशभरात एटीएम मशीन्स सुरू करण्यात आल्या. मात्र, या मशिन्स ग्राहकांसाठी कधी-कधी डोकेदुखी ठरतात. एटीएम मशीनमधून पैसे काढताना काही वेळा ग्राहकांच्या खात्यातून पैसे डेबिट होतात मात्र त्यांना मिळत नाही. अशा घटना वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने खात्यातून डेबिट केलेली रक्कम सात दिवसांच्या आत ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. सात दिवसांमध्ये पैसे जमा केले गेले नाही तर, आठव्या दिवसापासून दंड भरावा असेही या आदेशात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या महाव्यवस्थापक नीलिमा रामटेके यांनी हे आदेश बँकांना पाठवले आहेत. त्यासोबतच डेबिट व क्रेडिट कार्ड व्यवहाराच्या सुरक्षिततेचा अहवालही सादर करण्यास सांगण्यात आला आहे.