आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी सावंतला भाजपात प्रवेश मिळणार का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आयटम गर्ल राखी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी राखी सावंत मुंबईहून दिल्लीकडे रवानाही झाली आहे. दिल्लीत पोहोचताच तिने 'दिल्ली मे चाय पिने आयी हूं' असे सांगितले. मला भाजपचे नेते राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची आहे. मी जशी मिडियाची लाडकी आहे. तशीच भाजपचीही लाडकी मुलगी आहे. होय मला भाजपमध्ये जायचे आहे. भाजपचे नेते योग्य तो निर्णय घेतील असे सांगत राखीने दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात एंट्री मारली आहे.
त्याआधी मुंबईत बोलताना राखीने सांगितले की, दिल्ली, मुंबईतील जनता रस्त्यावर उतरून मोदींना पाठिंबा देतील. देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी मोदींना पाठिंबा द्यावा, असे मी आवाहन करीत आहे. नरेंद्र मोदींच पंतप्रधान होतील, असा मला विश्वास आहे. आपण पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक असून, पक्षाने आपल्यावर काय जबाबदारी द्यावी याचा निर्णय घ्यावा, असेही राखीने म्हटले आहे.
दरम्यान, भाजपमधील नेत्यांनी राखीच्या प्रवेशाबाबत काहीही भाष्य केले नाही. मात्र, दिल्लीतील कार्यालयात राखी दाखल झाली आहे. आज माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक निवृत्त लष्करी अधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत. सिंह यांच्या प्रवेशाबाबत पक्षाने अधिकृत माहिती दिली आहे. मात्र पक्षाकडून राखीबाबत कोणतेही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे राखी खरोखरच भाजपमध्ये प्रवेश करणार का यापेक्षा भाजप राखीला पक्षात सामावून घेणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
पुढे वाचा, राज आणि उद्धव ठाकरे माझे भाऊ- राखी सावंत...