आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ATS News In Marathi, ISIS Terrorist, Divya Marathi, Iraq

इराकमध्ये बेपत्ता भारतीय तरुणांचा दहशतवादाशी संबंध नाही, एटीएसच्या अधिका-यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इराकमध्ये बेपत्ता असलेल्या चार भारतीय युवकांचा दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नाही, असा दावा एटीएसच्या अधिका-यांनी केला आहे. मुंबईतील हे चार तरुण मे महिन्यात धार्मिक यात्रेसाठी इराकला गेले आहेत. चारपैकी एका युवकाने काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांना पत्र लिहून इराकमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यावरून हे चारही तरुण इराकमधील दहशतवादी संघटनेत सहभागी होऊन घातपाती कारवायांत सहभागी झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती.
महाराष्‍ट्र एटीएसच्या एका अधिका-याने सांगितले, या तरुणांच्या डोक्यात ज्या लोकांनी कट्टर विचार भरवले आहेत ते भारतातील आहेत. त्यामुळे आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या माहितीनुसार हे तरुण दहशतवादी संघटनेशी संबंधित नाहीत.