आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू सालेमवर तळोजा तुरुंगात गोळीबार, खांद्याला गोळी लागल्याने बचावला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम याच्यावर तळोजा तुरुंगात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता गोळीबार झाला. खांद्याला गोळी लागल्याने तो बचावला. त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अ‍ॅड. शाहीद आझमी खून प्रकरणातील आरोपी देवेंद्र जगताप याने हा गोळीबार केल्याचे सूत्रांनी सांगितले.
नोव्हेंबर 2005 मध्ये सालेमला त्याची गर्लफ्रेंड मोनिका बेदीसह पोर्तुगालमध्ये अटक झाली होती. त्यानंतर भारताशी असलेल्या प्रत्यार्पण करारानुसार पोर्तुगालने दोघांनाही भारताच्या हवाली केले. तेव्हापासून सालेम तुरुंगात आहे. यापूर्वी दाऊद टोळीचा गुंड मुस्तफा डोसा याने 24 जुलै 2010 रोजी ऑर्थर रोड तुरुंगात सालेमवर चमच्याने हल्ला
केला तेव्हा त्याच्या चेहर्‍याला दुखापत झाली होती. त्यानंतर सालेमला तळोजा तुरुंगात हलवण्यात आले. हल्लेखोर जगताप याच्यासोबत संतोष शेट्टी या गुंडाचेही नाव समोर येत असून तुरुंगात ही शस्त्रे कशी पोहोचली, याचा पोलिस तपास करत आहेत.