आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ABVP च्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला, एक विद्यार्थी जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बेंगळुरूपाठोपाठ मुंबईतील अभाविपच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. आठ ते दहा जणांच्या घोळक्याने माटुंगा रोडवरील अभाविपच्या कार्यालयावर हल्ला केला आहे. हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

हैदराबादेतील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा रोहित वेमुला याने आत्महत्या केल्यानंतर देशभरात या घटनेचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहे. रोहितच्या आत्महत्येसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जबाबदार ठरवले जात आहे. त्यामुळे अभाविपच्या कार्यालयांवर हल्ले होत आहेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील अभाविपच्या या कार्यालयावर दुपारी चारच्या सुमारास हल्ला झाला आहे. आठ ते दहा जणांनी हा हल्ला केला. मात्र हे लोक कोण होते, ते कोणत्या संघटनांशी संबंधित होते, याबाबत मात्र काहीही माहिती नाही. पोलिस आजुबाजुच्या परिसरात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास करत आहेत.