आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतून असे दिसते विजय माल्यांचे किंगफिशर हाऊस,गोव्यातील व्हिला पेज थ्री पार्टीसाठी प्रसिद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डिफॉल्टर विजय माल्यांकडून बँकांची थकबाकी वसूल करण्यासाठी किंगफिशर एअरलाइन्सच्या मालकीच्या दोन प्रमुख मालमत्तांचा सोमवारी पुन्हा एकदा लिलाव होणार आहे.  मुंबईतील किंगफिशर हाऊस आणि गोव्यातील किंगफिशर व्हिलाचा यात समावेश आहे. SBI च्या नेतृत्त्वात देशातील बँकांनी या मालमत्तेचे रिजर्व्ह प्राईज आधी पेक्षा कमी ठेवले आहे.
 
लक्झरी हाऊसमध्ये माल्यांनी अनेकदा केल्या आहेत पेज थ्री पार्टी...
- मद्यसम्राट विजय माल्या हे आपल्या लक्झरी लाइफ स्टाइल, हायप्रोफाइल पार्टी आणि ऐशोआरामासाठी जगभरात फेमस आहेत. जगभरात त्यांचे आलीशान घर आणि व्हिला आहेत. काही भारतात तर काही विदेशात आहेत. गोव्यात असलेले ‘किंगफिशर व्हिला’ हे माल्यांचे खास घर आहे. किंगफिशर व्हिलामध्ये माल्यांनी बॉलिवूड सेलेब्ससोबत अनेकदा पेज थ्री पार्ट्या केल्या आहेत.

रिझर्व्ह प्राईजमध्ये 10 टक्के कपात... 
- किंगफिशर हाऊसच्या लिलावासाठी चौथ्यांदा तर किंगफिशर व्हिलाच्या विक्रीसाठी तिसर्‍यांदा प्रयत्न करण्यात आला आहे.
- गेल्या लिलावात यश न आल्याने 17 बॅँकांनी यावेळी प्रॉपर्टीजच्या रिझर्व्ह प्राईजमध्ये 10 टक्के कपात करण्‍यात आली आहे. 
- बँकांच्या वतीने यावेळी दोन्ही प्रॉपर्टीजचा लिलाव  SBICAPS च्या नेतृत्त्वात करण्यात आला आहे. 
- मिळालेली माहिती अशी की, किंगफिशर हाऊसची नवीन रिझर्व्ह प्राईज 103.50 कोटी रुपये तर व्हिलाची 73 कोटी रुपये आहे.  

माल्या सध्या ब्रिटनमध्ये... 
- विजय माल्या मागील दोन वर्षांपासून ब्रिटनमध्ये आहेत.  
- एसबीआयच्या नेतृत्त्वात 17 बँकांच्या समुहाने मुंबईतील किंगफिशर हाऊसचा ताबा घेतला होता. 
- किंगफिशर हाऊस मुंबई शहरातील विलेपार्ले भागात आहे. 17000 स्क्वेअर फूट जागेत हा बंगला बांधण्यात आला आहे. 
- शहरातील डोमेस्टिक एअरपोर्टपासून जवळच आहे.  
- गोव्यातील किंगफिशर व्हिलाची किंमत जवळपास 90 कोटी रुपये आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, किंगफिशर हाऊस आणि व्हिलाचे फोटोज... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...