आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत भरधाव ऑडीने तीन पोलिसांसह पाच जणांना चिरडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत एका भरधाव ऑडी कारने गुरूवारी मध्यरात्री तीन पोलिसांसह पाच जणांना चिरडले आहे. पाचही जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस जिमखाना परिसरात ही घटना घडली. तीन पैकी एका पोलिस कर्मचार्‍याची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिस रात्री शहरात गस्त घातल होते. जिमखाना परिसरात पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेडिंग लावले होते. भरधाव वेगात आलेल्या ऑडी कारने बॅरिकेडिंग तोडून पाच जणांना चिरडले. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. चालकाने मद्यपान केले होते की नाही, यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.