आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Audit Of Public Libraries Tabled On Council Of Ministry

ग्रंथालये पडताळणीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वंकष पडताळणीचा अहवाल बुधवारी मंत्रिमडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. सर्व अटी व शर्तींची पूतर्ता करीत असलेली 5784 ग्रंथालये चालू वर्षीच्या नियमित अनुदानासह 50 टक्के वाढीव अनुदानास पात्र राहतील. त्रुटी आढळून आलेल्या 5788 ग्रंथालयांना पूर्तता करण्याकरिता 3 महिन्यांचा कालावधी देण्यात यावा. मान्यता रद्द करण्यायोग्य आढळून आलेल्या 914 ग्रंथालयांच्या तरतुदीनुसार व विहित पद्धतीने मान्यता
रद्द करण्यात यावी.