आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Collector Veerendra Singh Transfer Issue

वीरेंद्र सिंहांची उचलबांगडी; जिल्हाधिकाऱ्यांना भोवला माजी मुख्यमंत्र्यांचा अनादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- परदेशी शिक्षणासाठी निवड झाल्यामुळे औरंगाबादचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांची बदली झाल्याचे सांगण्यात येत असले तरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा अनादर करणे त्यांना महागात पडले आणि राजशिष्टाचार न पाळल्यामुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

उत्तरांचलमध्ये आंतरराज्य सेवेत नियुक्तीवर गेलेल्या निधी पांडे यांना राज्यात बोलावून त्यांना औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. चव्हाण हे औरंगाबादेत निवेदन देण्यासाठी आले असता राजशिष्टाचारानुसार जिल्हाधिकारी सिंह उठून उभे राहिले नाहीत. त्यामुळे त्यांची उचलबांगडी करून त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, वीरेंद्र सिंह यांची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेण्यासाठी केंद्र सरकारकडून त्यांची निवड झाल्याचे प्रशासकीय कारण सांगण्यात आले.