मुंबई - औरंगाबादेत 2006 मध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी मोक्का न्यायालयाने सोमवारी रियाझ अहमद या आरोपीला जामीन मंजूर केला.
महाराष्ट्र संगठित गुन्हेगारी विरोधक कायदा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जी.टी. कादरी यांनी 5 हजारांच्या हमीवर रियाझला जामीन दिला. खटल्यातील 21 आरोपींपैकी आतापर्यंत दोघांना जामीन मिळालेला आहे. या प्रकरणात लश्कर-ए-तोयबाचा हस्तक व 26/11 मुंबई हल्ल्याचा कारस्थानी सय्यद जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबु जुंदाल हा प्रमुख आरोपी आहे.
2006 मधील घटना
राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पथकाने मे 2006 मध्ये औरंगाबाद परिसरातून प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता. या कारवाई 43 किलो आरडीएक्स, 50 हातगोळे, 16 एके-47 रायफल्स व तीन हजारांपेक्षा अधिक बुलेट्स, असा शस्त्रसाठा जप्त केला होता.