आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- ऑनलाइन खरेदीची बाजारपेठ दिवसेंदिवस विस्तारत चालली असून त्यामध्ये आता नाशिक आणि औरंगाबाद या शहरांनी सर्वात मोठे 'ई-कॉर्मस हब' म्हणून स्थान मिळवले आहे. ग्रामीण भागात ई-कॉर्मसचे मुख्य केंद्र बनण्यात जळगाव दुसर्या क्रमांकावर असून अव्वल निर्यात केंद्रांमध्येदेखील नाशिक आणि औरंगाबाद शहरांचा समावेश झाला असल्याचे 'इबे इंडिया सेन्सेस 2012' या अहवालात म्हटले आहे.
खरेदीमध्ये आता ऑनलाइन शॉपिंग हा राष्ट्रीय स्तरावरचा मुख्य प्रवाहातील घटक ठरला आहे. देशातील 28 राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवळपास 4 हजार 306 ई-कॉर्मस केंद्रांची नोंद झाली आहे. अगोदरच्या वर्षातल्या 'इबे सेन्सेस' अहवालाच्या तुलनेत या केंद्रांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे. देशभरातील 3 हजार 281 आणि ग्रामीण भागातील 1,015 केंद्रांमधून ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी केल्याचे 'इबे इंडिया'च्या पाचव्या वार्षिक सर्वेक्षणात म्हटले आहे.
सर्वोत्तम ई-कॉर्मस केंद्रांमधील ऑनलाइन खरेदी, विक्री, आयात आणि निर्यातीबाबतचे महत्त्वाचे दस्तऐवज आदींचा समावेश या सर्वेक्षणात आहे. देशातील 20 ई-कॉर्मस केंद्र, 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिसणारे खरेदीचे कल यात टिपण्यात आले आहेत. या सर्वेक्षणातील ग्राहकांच्या खरेदीबाबतचा रंजक कल दिसून येतो. ऑनलाइन खरेदीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने आपली आघाडीचे स्थान कायम राखत उलाढालीत 48 टक्क्यांचा वाटा नोंद केला आहे. त्या पाठोपाठ महिला ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे लाइफस्टाइल गटाने 41 टक्के वाटा कमावला आहे.
- जागतिक खरेदीदार 141 देशांमधील इबे व्यावसायिकांकडून खरेदी करण्यासाठी 2638 भारतीय शहरांमधील भारतीय खरेदीदार आपले खिसे मोकळे करत आहेत.
- भारतातील 523 निर्यात केंद्रांतील भारतीय कारागिरांनी हाताने तयार केलेल्या वस्तू 201 देशांमधील खरेदीदार खरेदी करत असल्याने रिटेल खरेदीदारांची संख्या मोठी आहे.
- सर्वात मोठे पाच ब्रँड्स : अँपल, सॅमसंग, सोनी, ब्लॅकबेरी आणि नोकिया.
- अव्वल एक्स्पोर्ट हब : मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद.
- ऑनलाइन खरेदीची सर्वाधिक उलाढाल करणारी राज्ये : महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू,चेन्नई.
- सर्वोत्तम ब्रँड्स : सॅमसंग, अँपल, सोनी, नोकिया आणि सॅनडिस्क हे सर्व इबेवरील भारतातील सर्वोत्तम ब्रँड्स आहेत.
- महाराष्ट्रातील अव्वल ई-कॉर्मस हब : मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक
- अव्वल ग्रामीण ई-कॉर्मस हब : दिंडोरी, जळगाव, सेलू, तुमसार, जावळी
- आयात करण्यात येणार्या अव्वल पाच वस्तू : ब्रिटिश वसाहतीचे भारताचे स्टॅम्प्स, मोबाइल फोन स्किन्स, फॅशन नेकलेसेस, ड्रेसेस, हॅट्स.
- सर्वाधिक 5 खरेदी : मोबाइल केसेस, ब्रिटिश इंडिया कॉइन्स, पुरुषांचे सेंट्स, मेमरी कार्ड रीडर्स आणि टॅब्लेट्स.
- निर्यातीमधील अव्वल पाच वस्तू : हिर्याच्या खड्यांनी सजलेले नेकलेसेस, क्राफ्ट कापड, डीव्हीडी, घड्याळाचे भाग आणि स्कर्ट्स.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.