आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरकॉप विश्वास नांगरे पाटील सांगतात,...तर आत्महत्या केली असती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात असलेल्या गृहखात्याने आज शुक्रवारी 10 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक व कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये त्यांच्या जागी अजित पाटील यांची बढतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पाटील हे पुण्याला आर्थिक गुन्हे शाखेत उपमहानिरीक्षकपदावर कार्यरत होते. काहींना बढती तर काहींची केवळ बदली...
>कैसर खलिद यांना महानिरीक्षकपदी बढती
>जी. एम. पाटील यांची अतिरिक्त पोलिस अधिक्षकपदी अहमदनगरला बढती
>अमोघ गावकर यांची पोलिस अधिक्षक म्हणून सिंधुदुर्गमध्ये बढती
>IPS सुनील फुलारी यांची कमांडर SRPF, पुणे येथे बढती
>IPS निर्मला देवी यांची पोलिस अधिक्षक नागपूरमध्ये बदली
>IPS महेश घुर्ये यांची कमांडर SRPF मुंबई येथे बढती
>भारत तांगडे यांची कमांडर SRPF, जालना अशी बदली
>पंजाबराव उगले यांची नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षकपदी बदली

'मन मे है विश्वास'ला उदंड प्रतिसाद...
एक कर्तव्यतत्पर पोलिस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्रातील तरुणाई त्यांना आदर्श मानते. युवकांना मार्गदर्शक ठरणारे त्यांचे पुस्तक 'मन मे है विश्वास' नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्‍तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही दिवसात या पुस्‍तकाच्‍या तीन आवृत्त्या आल्याने पुस्तक विक्रम करण्याच्या मार्गावर आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. याला विश्‍वास नांगरे पाटील हे अपवाद नाहीत. त्यांच्‍या आयुष्‍यात त्‍यांची पत्नी रुपाली यांचे अमुल्य सहकार्य आहे. नवऱ्याची मैत्रीण, सहकारी म्हणून सक्षमपणे त्‍या आपली भूमिका पार पाडतात.

पुढील स्लाइडवर वाचा...
>विश्‍वास नांगरे पाटलांना औरंगाबादने दिले वेगळे वळण..
> विश्वास नांगरे पाटील सांगतात, ... तर आत्महत्या केली असती
>धुळ्यात विश्वास नांगरे पाटलांची पहिली बदली आणि लग्न


(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...