आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad Shendra MIDC News In Marathi, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्यमशील औरंगाबाद: शेंद्रय़ात एक लाख कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर (डीएमआयसी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत फेब्रुवारी अखेर शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात एक लाख कोटींहून अधिक गुंतवणूक होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात गुरुवारी ही माहिती दिली. या वेळी 36 सामंजस्य करार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर अंतर्गत औरंगाबाद नजीकच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीचा विकास करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पुढचे पाऊल म्हणून या महिनाअखेर राज्याच्या वतीने 36 विविध सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. त्यातून एक लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक शेंद्रा येथे होणार आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने पायाभूत प्रकल्पांसाठी होणार आहे. राज्यातील औद्योगिक विकासासाठी सरकारने आता पावले टाकण्यास सुरुवात केली असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, राज्यातील औद्योगिक आणि पायाभूत सुविधांसाठी सरकारने पुढाकार घेतला असून नवी मुंबई विमानतळ, नागपुरातील मिहान इंटरनॅशनल एअर कार्गो या मोठय़ा प्रकल्पासांठीही पावले टाकण्यात येत आहेत.

शेंद्रा-बिडकीन उजळणार
डीएमआयसी अंतर्गत देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन शहरादरम्यान औद्योगिक वसाहती विकसित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी औरंगाबादनजीकच्या शेंद्रा-बिडकीन परिसराची निवड केली आहे. दाओस येथे नुकत्याच झालेल्या आर्थिक परिषदेत शेंद्रा-बिडकीन येथे स्मार्ट सिटी उभारण्याबाबत मुख्यमंत्री चव्हाण यांनी असेंचर कंपनीशी चर्चा केली होती. यामुळे आर्थिक गुंतवणुकीसह अतिउच्च् दर्जाचे राहणीमान, वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, कुशल व प्रभावी सुव्यवस्थापन याठिकाणी असेल. आता एक लाख कोटींच्या गुंतवणुकीमुळे शेंद्रा परिसर उजळणार आहे.