आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Smart City Project News In Divya Marathi

स्मार्ट सिटी योजनेसाठी औरंगाबादला हवेत 1595 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील १० शहरांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी २९ हजार ६४७ कोटी रुपयांचे प्रस्ताव पाठवले आहेत. औरंगाबादचा प्रस्ताव १५९५.५ कोटी रुपयांचा आहे. ठाण्याचा सर्वाधिक म्हणजे ६,६३० कोटींचा तर मुंबईचा सर्वात कमी म्हणजे १ हजार ११८ कोटींचा प्रस्ताव आहे.
मुंबई महापालिकेने सर्वात कमी रकमेचा प्रस्ताव दिल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्र सरकार स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून शहरावर पडद्याआडून नियंत्रण मिळवू पाहत आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका फेटाळली होती.
ठाणे : ६,६३०
अमरावती : ५,३०५
नागपूर : ३,४०९
पुणे : २,९३२
सोलापूर : २,९२१
कल्याण-डोंबिवली : २,०५७
नाशिक: १,९४५
नवी मुंबई: १,७३४
औरंगाबाद: १,५९५
मुंबई : १,११८