आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद झाले खुले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले असून औरंगाबाद, जालना जि.प.चे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. उस्मानाबाद, बीड, परभणी, पुणे खुलेच आहे. अकोला, बुलडाणा अनूसूचित जाती, तर वाशीम, नांदेड अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव आहे. अमरावती, नंदुरबार अनुसूचित जमाती, तर अनुसूचित महिलांसाठी जळगाव, ठाणे, यवतमाळचे पद राखीव आहे. ओबीसी महिलांसाठी चंद्रपूर, भंडारा, हिंगोली, नाशिक व नगर राखीव ठेवण्यात आले आहे.
ओबीसी प्रवर्गासाठी सातारा, रायगड, रत्नागिरी व गडचिरोली राखीव आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी लातूर, धुळे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, गोंदिया, वर्धा, नागपूर सुटले आहे.