आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- आंतरराष्ट्रीय वृत्त संस्था 'मूडीज'ने भारताच्या पतमानांकनात वाढ केली आहे. यावरुन सत्ताधारी भाजप पक्ष आर्थिक सुधारणांसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे श्रेय घेत आहे. यावरुन विरोधी पक्षही भाजपवर चांगलीच टीका करत आहे. मात्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून सोशल मिडीयावर टीका करताना एक घोळ झाला आणि त्याचा फटका काहीही संबंध नसताना ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांना बसला.
झाले असे की, मूडीजने तब्बल 13 वर्षांनंतर मूडीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या मानांकनात वाढ केली आणि अर्थव्यवस्थेच कौतूक केल. सरकार राबवत असलेल्या सुधारणांचाच हा परिणाम असल्याच भाजपतर्फे सांगितले जात आहे. अर्थातच विरोधकांना ही बाब रुचली नाही. टीका करण्यासाठी त्यांनी थेट मूडीज या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या फेसबूक पेजचा शोध घेतला. मात्र त्यांच्या हाती लागले ते होते क्रिकेटपटू टॉम मूडी. मग काय, अतिउत्साहात खातरजमा न करुन घेता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने क्रिकेटपटू मूडीज यांच्या फेसबूकपेजवरच टीका केली. त्यानंतर, 'भारतीय अर्थव्यवस्थेला असं रेटिंग दिल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे, नामाकंनात सुधारणा करण्यासाठी तुम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडून कमिशन घेतली. 2019 मध्ये तुमच्या मोदींना पराभवाची धूळ चाखायला लावू’, अशा टीकेचा भडीमार त्यांच्यावर युझर्सनी केला.
अशी लक्षात आली चूक
अखेर एका युझरने हा घोळ उघड केला. 'प्रिय कॉम्रेड्स, मूडिज हे निष्पाप आहेत. त्यांनी कधीही मोदींचे कौतूक केले नाही. लाल सलाम', असा संदेश त्यांनी पोस्ट केला. त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी टॉम मूडी यांची माफीही मागितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.