आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'नो पार्किंग\'मध्ये रिक्षा उभी करून चालकाची वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'नो पार्किंग' मध्ये रिक्षा उभी करून चालकाने वाहतूक पोलिसालाच धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल (गुरुवारी)  कल्याणमध्ये घडली होती. मात्र, आज (शुक्रवारी) या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे हे प्रकरण?
चालकाने रिक्षा नो पार्किंगमध्ये उभी केली. नंतर तो खरेदीसाठी निघून गेला. नंतर वाहतूक पोलिस तिथे आला. त्याने चालकाला दंड भरण्यास सांगितला. त्यावर संतापलेल्या चालकानेच पोलिसाला धक्काबुक्की केली.या घटनेचा व्हिडिओ आज (शुक्रवार) सोशल मीडियावर व्हायरल झाला.

वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..
बातम्या आणखी आहेत...