आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटो चालकाची मुलगी ‘सीए’ परीक्षेत टॉपर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथील ऑटोरिक्षाचालकाच्या मुलीने चार्टर्ड अकाउंटन्सी (सीए) परीक्षेत देशपातळीवर पहिला क्रमांक पटकावून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने नोव्हेंबर 2012 मध्ये घेतलेल्या परीक्षेचे निकाल सोमवारी जाहीर झाले.

प्रेमा जयकुमार असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती मालाड उपनगरातील चाळीत एका खोलीत राहते. परीक्षेतील यशामुळे खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया प्रेमाने दिली. हे माझ्या आयुष्यातील मोठे यश आहे. खडतर परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रेमा म्हणाली. प्रेमा तामिळनाडूची मूळ रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून तिचे वडील येथे स्थायिक झाले आहेत. प्रेमाचे वडील जयकुमार पेरुमल उपजीविकेसाठी ऑ टोरिक्षा चालवतात.
‘बीकॉम’मध्ये दुसरी
‘सीए’परीक्षेत प्रेमाने 800 पैकी 607 गुण प्राप्त केले असून ती यशाचे श्रेय आई-वडिलांना देते. त्यांचे पाठबळ आणि आशीर्वादामुळे मला यश मिळू शकले. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत, आता त्यांनी आरामाचे जीवन जगावे, अशी भावना प्रेमाने व्यक्त केली. तिने किशोर शेठ अ‍ॅँड कंपनीमध्ये आर्टिकलशिप केली आहे. प्रेमा बीकॉम तृतीय वर्षाच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवत विद्यापीठात दुसरी आली आहे. तिचा भाऊ आयसीएआय परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आई- वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे या वेळी भावंडांनी सांगितले.