आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOW: मुंबईतील रिक्षा चालकाच्या मुलाने कचऱ्यातून तयार केली CAR

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरंच विचार करण्यासारखी स्टोरी आहे. तुम्ही यापूर्वी कधी युट्यूब व्हिडिओ बघितला होता... आठवा जरा... त्यातून काही तयार करण्याची प्रेरणा मिळाली का... नाही... कदाचित नाहीच... आपण अनेक तास ऑनलाईन घालवतो... युट्यूबला बराच काळ देतो... पण या रिक्षा चालकाच्या 19 वर्षीय मुलाने जे करुन दाखवले ते नक्कीच प्रेरणदायी आहे. त्याने चक्क युट्यूब बघून कचऱ्यातून कार तयार केली. त्यासाठी त्याच्या वडीलांनी पै पै जमवून एक रक्कम त्याला दिली. त्याचा सदुपयोग त्याने करुन दाखवला.
प्रेम ठाकूर असे या मुलाचे नाव आहे. नवी मुंबईतील या मुलाने YouTube DIY (Do-It-Yourself) वर व्हिडिओ बघून कार तयार केली. चार महिन्यात त्याने कचऱ्यातून साहित्य गोळा करुन कारचे चेसिस तयार केले. त्याला पेंट केले. त्यातून कारचा ढाचा तयार झाला.
प्रेमला बालपणापासून कार्सची आवड आहे. वडीलांनी कॉम्प्युटर घेऊन दिले तेव्हापासून त्याच्या डोळ्यांत नवीन कार तयार करण्याचे स्वप्न होते.
मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडीलांनी पै पै जमा केले. 2 लाख 50 हजार रुपये मुलाला दिले. ही रक्कम त्यांच्यासाठी खुप मोठी आहे. पण त्यांचा मुलाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता.
प्रेमला इंजिनिअरिंगचे कोणतेही बॅकग्राऊंड नाही. तरीही त्याने हुंदाई असेंटचे इंजिन वापरुन कार तयार केली. प्रेमला ऑटोमोबाईल इंजिनिअर व्हायचे आहे. त्याचे हेही स्वप्न पूर्ण होईल अशी आशा करुयात...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... प्रेमने कशी तयार केली कार... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ....
सौजन्य- Video Volunteers
बातम्या आणखी आहेत...