आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auto Rickshaw Driver On Strike Warning To Sharad Rao

राज्यभरातील रिक्षाचालक संपावर जाणार; शरद राव यांचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र शासन कॉड्रिसायकल रिक्षा (चार चाकी) रस्त्यावर आणत आहे. या धोरणात बदल केला नाही तर 18 जूनपासून राज्यातील तीन चाकी रिक्षा संपावर जातील, असा इशारा मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. महाराष्ट्र शासन ऑटोरिक्षा चालक-मालकांशी चर्चा टाळत आहे.
ऑटोरिक्षा चालक-मालकांच्या विरोधात जाणीवपूर्वक धोरणे राबवून त्यांना देशोधडीला लावत आहे. तीन चाकी रिक्षाच्या ठिकाणी शासन कॉड्रिसायकल रिक्षा (चार चाकी) आणि सहा आसनी टॅक्सी आणू पाहत आहे, असा आरोप शरद राव यांनी केला.

ऑटो रिक्षांचे आयुष्य कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच एक मे पासून भाडे सुधारास मान्यता देऊनही त्याच्या अंमलबजावणीस शासन आता नकार देत आहे. ऑटोरिक्षा चालक-मालकांसाठी स्वतंत्र मंडळाची निर्मिती करण्यास चालढकल होत आहे, असा आरोप मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने केला आहे. या पार्श्वभूमीवर 15 जून रोजी पिंपरीत महाराष्ट्रव्यापी मेळावा होत आहे.