आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Auto Rikshwa Strik On 21 To 23 August In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील रिक्षाचालक तीन दिवस जाणार संपावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हकीम समितीने सुचवलेली दरवाढ लागू करावी यासह 18 मागण्यांसाठी राज्यातील रिक्षाचालक 21 ऑगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.

ऑटोरिक्षा चालक - मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज (सोमवार) पार पडली. या बैठकीत संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे शरद राव यांनी सांगितले आहे.

राज्यातील जवळपास 15 लाख रिक्षा चालक 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी संपावर जाणार आहेत. तीन दिवसांच्या या संपामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या ऑटोरिक्षांचा संपात सहभाग असणार की नाही, या बद्दल निश्चित माहिती मिळालेली नाही.