आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Autorish, Best Workers Strike For The Pending Demand

प्रलंबित मागण्यांसाठी रिक्षा, बेस्ट कामगारांचा बंदचा इशारा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 17 जूनपासून रिक्षा-बेस्ट बंद पुकारतील असा इशारा म्युनसिपल मजदूर युनियन या कामगार संघटनेने बुधवारी दिला आहे. मागण्या मंजूर करण्यासाठी या संघटनेने राज्य शासनाला पाच दिवसांचा अवधी दिल्याची माहिती कामगार नेते शरद राव यांनी पत्रकारांना दिली.


केंद्र शासनाच्या कर्मचा-यांप्रमाणे महापालिका कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगाचे लाभ मिळावेत, रिक्षांना नवी भाडेवाढ लागू करावी आणि बेस्ट कर्मचा-यांची थकबाकी विनाविलंब मिळावी, अशा कामगार संघटनेच्या मागण्या आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी कामगारांनी भायखळा ते आझाद मैदान दरम्यान मोर्चा काढला होता.यावेळी झालेल्या सभेत कामगार नेते शरद राव यांनी राज्य शासनावर जोरदार टीका केली.