आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना मंत्र्यांची संपत्ती जाहीर करण्यास टाळाटाळ; 21 कॅबिनेट, 13 राज्यमंत्र्यांची जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्व मंत्र्यांनी आपली संपत्ती आणि त्यांच्यावर असलेल्या कर्जाची माहिती ३१ ऑगस्टपर्यंत जाहीर करून सरकारने ही सर्व माहिती वेबसाइटवर टाकणे बंधनकारक आहे. केंद्रातील मंत्र्यांनी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सगळ्यांनी संपत्तीची माहिती वेबसाइटवर टाकली आहे. मात्र, नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मात्र संपत्ती जाहीर करणाऱ्या मंत्र्यांची यादी वेबसाइटवर अपलोड केली नसल्याचे दिसून येत आहे. माहिती अधिकारातही २१ कॅबिनेट आणि १३ राज्यमंत्र्यांनी संपत्ती जाहीर केल्याचे समोर आले असून शिवसेनेच्या मंत्र्यांनी मात्र संपत्ती जाहीर केलेली नाही. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत किती मंत्र्यांनी संपत्ती घोषित केली याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे मागितली होती. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ कॅबिनेट मंत्र्यांपैकी २१ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्र्यांपैकी १३ राज्यमंत्र्यांनी संपत्ती जाहीर केल्याची माहिती दिली. मात्र, ही माहिती वेबसाइटवर अपलोड करण्यात आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे,  आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत या शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांसह महसूल राज्यमंत्री संजय राठोड, ग्रामविकास राज्यमंत्री  दादा भुसे आणि गृहनिर्माण व उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची नावे यादीत नाहीत.  
 
राज्यमंत्री वायकर संपर्क क्षेत्राच्या बाहेर 
याबाबत शिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी ‘दिव्य मराठी’ ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. एसएमएसलाही त्यांनी उत्तर दिले नाही. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संपत्ती जाहीर केलेल्या मंत्र्यांची यादी सरकारी वेबसाइटवर प्रसिद्ध केली होती. पण फडणवीस सरकार पारदर्शी कारभाराचा दावा करीत असतानाही यादी जाहीर केली जात नाही.
 
बातम्या आणखी आहेत...