आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ax A C Of MSD, SRK, Salman Khan, Sachin Tendulkar Hacked

सीएच्‍या विद्यार्थिनीकडून शाहरुख, सलमान, सचिन, धोनीचे ई-फाईलींग खाते हॅक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सनदी लेखापाल अभ्‍यासक्रम पूर्ण करणा-या एका विद्यार्थिनीने देशातील नामवंत उद्योगपतींसह सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांच्‍या कर विवरणाच्‍या फाईल्‍स चोरल्‍याची माहिती उघड झाली आहे. मुंबई पोलिसांकडून उद्योगपती अनिल अंबानी यांच्‍या प्राप्‍तीकर विवरणाचे ई-फाईलींग हॅक झाल्‍याप्रकरणी याच विद्यार्थिनीला पकडण्‍यात आले होते. तिच्‍यासोबत आणखी एका विद्यार्थ्‍याची चौकशी सुरु होती. त्‍याचदरम्‍यान या मुलीने विद्यार्थिनीने अनेक बड्या व्‍यक्तीचे ई-फाईलींग खाते हॅक केल्‍याचे लक्षात आले आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, या विद्यार्थिनीने नोयडा येथून अंबानी यांचे खाते हॅक केले होते. आता तपासानंतर तिने आणखी काही जणांचे खाते हॅक केल्‍याचे उघड झाले. सायबर गुन्‍हे शाखेच्‍या पोलिसांनी या मुलीची चौकशी केली. ही मुलगी हैदराबाद येथे आर्टीकलशिप करत आहे. पोलिसांनी अंबानी यांचे खाते हॅक करणा-या संचित कटीयाल याला अटक केली. त्‍यानंतर या मुलीबद्दल माहिती मिळाली. दोघांनी प्रसिद्ध व्यक्तींचे खाते हॅक केले. अंबानींचे गेल्या काही वर्षांतील उत्पन्न व भरलेल्या कराची माहिती घेण्याच्या उत्सुकतेपोटी विद्यार्थिनीने हा उपद्व्याप केला.

कसे केले सचिन, धोनीचे खाते हॅक? जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...