आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द हाेणार नाही, अफवांनंतर रिझर्व्ह बँकेची स्पष्टाेक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाेटबंदीनंतर खासगी क्षेत्रातील अग्रणी असलेल्या अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये पाचशे अाणि एक हजारच्या जुन्या नाेटा जमा किंवा बदली करताना अनियमितता झाल्याप्रकरणी बँकेच्या १९ कर्मचाऱ्यांची चाैकशी सुरू अाहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द करण्याची शक्यता असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली अाहे. परंतु अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द करण्याबाबत काेणतीही कार्यवाही सुरू करण्यात आली नसल्याचे रिझर्व्ह बँकेकडून साेमवारी स्पष्ट करण्यात अाले अाहे.

नाेटबंदीनंतर राेख रकमेचा गैरव्यवहार करण्याच्या अाराेपाप्रकरणी काही बँक अधिकाऱ्यांवर सध्या कारवाई करण्यात येत असून त्यामध्ये अॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त हाेती. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून अॅक्सिस बँकेवर कारवाई हाेऊन परवाना रद्द हाेण्याची शक्यता वर्तवण्यात येत हाेती. काही प्रसारमाध्यमांमध्येही याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले हाेते. त्याचप्रमाणे साेशल मीडियावरूनदेखील अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द हाेणार असल्याचे संदेश फिरत हाेते. परंतु ही अफवा असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले अाहे. अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये नाेटा जमा करताना किंवा बदलताना झालेल्या व्यवहारात अनियमितता झाल्याचा अाराेप असल्याच्या पार्श्वभूमीवर अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द करण्यासाठी काेणताही कारवाई करण्यात आली नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले अाहे. बँक परवाना रद्द करणारे वृत्त खाेटे अाणि खाेडसाळपणाचे असल्याचे स्पष्टीकरण अॅक्सिस बँकेने मुंबई शेअर बाजाराला दिले अाहे.
बातम्या आणखी आहेत...