आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Azim Premazi A Year Donated 8 Thousand Crores Assets

अझीम प्रेमजींकडून वर्षभरात 8 हजार कोटींची संपत्ती दान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हुरून इंडिया नामक संस्थेने केलेल्या पाहणीनुसार विप्रो उद्योग समूहाचे प्रमुख अझीम प्रेमजी हे देशातील सर्वात दानशूर व्यक्ती आहेत. त्यांनी गेल्या वर्षभरात सुमारे आठ हजार कोटी रुपयांची रक्कम विविध रूपांनी दान केली आहे. हुरून इंडियाने देशातील 10 दानशूर व्यक्तींची सूची जारी केली आहे. या यादीत पहिले स्थान अझीम प्रेमजी यांनी काबीज केले आहे. प्रेमजी यांनी 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीत सुमारे 8000 कोटी रुपये दान केले आहेत.
प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रोमध्ये प्रेमजी यांची 57 टक्के हिस्सेदारी आहे. त्यापैकी 10 टक्के वाटा प्रेमजी यांनी अझीम प्रेमजी फाउंडेशनला दान केला आहे. ही संस्था ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रसारासाठी काम करते. दानशूर व्यक्तींच्या यादीत दुस-या स्थानी एचसीएल ग्रुपचे अध्यक्ष शिव नादर आहेत. नादर यांनी एप्रिल 2012 ते मार्च 2013 या कालावधीते 3000 कोटी रुपयांचे दान केले आहे.
शिव नादर फाउंडेशन हे शैक्षणिक क्षेत्रात तर काम करतेच, त्याचबरोबर शैक्षणिक विस्तारासाठी या संस्थेमार्फत कामे केली जातात. त्याचा लाभ देशभरातील सुमारे 15 हजार विद्यार्थ्यांना थेट स्वरूपात होतो. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या फाउंडेशनने सामाजिक कार्याची 20 वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. या यादीत तिस-या स्थानी जीएमआर ग्रुपचे अध्यक्ष जी. एम. राव हे आहेत.