आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B.Com Marks Give Within Two Days ; High Court Ordered To All Collages In State

बीकॉमचे मार्क्स दोन दिवसांत द्या ; उच्च न्यायालयाचे राज्यातील महाविद्यालयांना आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बी. कॉम.ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून देण्यात येणारे प्रॅक्टिकल्सचे मार्क्स दोन दिवसांत द्यावेत, जेणेकरून राज्यातील विद्यापीठांना नियोजित वेळेत निकाल देणे शक्य होईल, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व महाविद्यालयांना बुधवारी दिले.


सहावा वेतन आयोग, सेट-नेटमध्ये शिथिलता द्यावी, या मागणीसाठी राज्यातील प्राध्यापक तीन महिन्यांपासून संपावर गेले असून त्यांनी उत्तरपत्रिका तपासणीवरही बहिष्कार टाकला आहे. त्याविरोधात विद्यार्थी परिषदेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.