आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाची लाज वाटते म्हणणा-या रियाला 24 तासांत उपरती, डिलीट केले वादग्रस्त टि्वट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री रिया सेन - Divya Marathi
अभिनेत्री रिया सेन
मुंबई- घरातील एसीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीनंतर अभिनेत्री रिया सेन हिने आगपागड केली. अग्निशमन दलाचे अधिकारी तासाभराने आल्यामुळे माझे दोन फ्लॅट्स जळून खाक झाले, असल्या देशाची मला लाज वाटते असे वादग्रस्त टि्वट रियाने केले होते. मात्र, 24 तासांतच रियाला उपरती झाली व 'आग'पाखड केल्यानंतर पलटी मारली. रियाच्या त्या टि्वटनंतर चोहोबाजूंनी टीका झाल्यानंतर रियाने ते टि्वट डिलीट करून टाकले व शेजारी व अग्निशमन दलाचे आभार मानणारे टि्वट लगेच करून टाकले. दुसरीकडे, रिया रेनचा दावा अग्निशमन दलाची फेटाळून लावला आहे. आमच्यामुळे सेन कुटुंबियांचे कोट्यावधीचे नुकसान टळले आहे असे अग्निशमन दलाच्या अधिकार्‍याने सांगितले.
ज्येष्ठ अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार असलेल्या मूनमून सेन यांच्या जुहू येथील ‘रुईया पार्क’ इमारतीतील घराला शनिवारी मध्यरात्री मोठी आग लागली. त्यावेळी त्यांची मुलगी रिया सेन आणि पती घरात होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी दोन तासांत आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत रियाचे दोन फलॅट्स आगीत जळून खाक झाले. फ्लॅट्सचे नुकसान झाल्यामुळे रिया संतापली आहे. तिने ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. अग्निशमन दलासोबत देशालाही नावे ठेवली आहेत. “Our building's on fire! We've lost two of our flats! And the fire engine took an hour to arrive! Shame on this country!"असे ट्विट केले होते.
कोट्यावधीचे नुकसान टाळले-
अभिनेत्री रिया सेन हिने ट्विटच्या माध्यमातून केलेले आरोप अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी फेटाळले आहेत. अग्निशमन नियंत्रण कक्षाला पहाटे दीडनंतर कॉल आला. रात्री रस्ते मोकळे असल्याने आम्ही अवघ्या 15 मिनिटांत घटनास्थळी पोचलो होतो. मात्र इमारतीच्या आजूबाजूला अनेक गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. त्यामुळे फायर इंजिन इमारतीपर्यंत न्यायला विलंब झाला. शिवाय इमारत जुनी असल्याने तिथे अग्निरोधक यंत्रणाही नव्हती. आम्ही घरातील व्यक्तींची सुटका केली तसेच सेन कुटुंबाची 50 लाखांची रोकड, सोन्याचे दागिने, पासपोर्ट वाचवले, असे अग्निशमन दलाच्या अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे रियाचा राग घर जळाल्यामुळेच झाल्याचे समोर आले. त्यावरून रियावर चोहोबाजूंनी टीका झाल्यानंतर तिने पहिले टि्वट डिलीट करून नंतर आभार मानणारी दोन टि्वट केले.
पुढे वाचा, रिया सेनने केलेली टि्वट...