आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे : दक्षिणेत अल्पवयीन मुलींची Verginity मागायचा मांत्रिक, 22 जणींवर बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी मांत्रिक विजय थांबे. - Divya Marathi
आरोपी मांत्रिक विजय थांबे.
ठाणे(महाराष्ट्र) - पोलिसांनी एका अशा मांत्रिकाला अल्पवयीन मुलींच्या बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येणाऱ्यांच्या कुटुंबाच्या अडचणी दूर करण्यासाठी तो दक्षिणा म्हणून त्यांच्या अल्पवयीन मुलींची मागणी करायचा.
विजय थांबे असे त्याचे नाव असून आतापर्यंत 22 मुलींचे बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपी एलआयसी एजंट असून स्वतः मांत्रिक असल्याचे तो सांगतो असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकत 15 वर्षाच्या एका मुलीला सोडवले आहे. त्याने या मुलीला बंधक बनवून ठेवले होते.

पैसे देऊन करायचा प्रचार
आरोपी त्याच्या एका सहकारी महिलेसह (एजंट) विमा काढायच्या नावाखाली या लोकांच्या घरी जायचा. यावेळी कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासठी पुजेचा उपाय तो या लोकांना सुचवायचा. परिसरात ज्या कुटुंबाची आर्थिक स्थिती एखाद्या घटनेमुळे डबघाईला आली असे अशा कुटुंबावर त्यांचा डोळा असायचा. त्यानंतर आरोपी त्यांच्या घरी पुजा करून त्याच्या मोबदल्यात दक्षिणेच्या रुपात त्यांच्या अल्पवयीन मुलींची मागणी करायचा. आरोपी मांत्रिक त्याच्या सहकारी महिलेचा वापर त्याची जाहिरात करण्यासाठी करायचा. ती त्याच्यासाठीच काम करायची. तांत्रिकने या परिसरातील काही कुटुंबीयांना मोठी रक्कम देत आपले अनुयायी बनवून घेतले होते. तेही विजयचा प्रचार करायचे.

भक्तालाच बनवले साक्षीदार
सहआयुक्त लक्ष्मी नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे क्राइम ब्रँचच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला 3 महिन्यांपूर्वी विजयबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर दोन वेळा पोलिसांच्या टीमने छापा मारला. पण तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी मांत्रिकावर अंधविश्वास असलेल्या त्याच्या व्यावसायिक भक्तालाच साक्षीदार बनवले. त्यानंतर मांत्रिकाला एका 15 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ठाणे क्राइम ब्रँचचे इन्सपेक्टर मदन बलार्ड यांनी पोलिसांना जानकी हिंडाले नावाच्या एका महिलेला अटक केल्याची माहिती दिली आहे. तीच तांत्रिकासाठी शिकारीचा शोध घ्यायची असेही पोलिसांनी म्हटले आहे. या दोघांवर चाइल्ड प्रोटेक्शन अॅक्ट, अंधविश्वास पसरवणे आणि बलात्काराची कलमे लावण्यात आली आहेत.