आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baba Ramdev Patanjali Noodles Maggie Got Bogus Licence Ncp

रामदेव बाबांच्या पतंजली नूडल्सचा परवाना बोगस- राष्ट्रवादीचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ट्रस्टने बाजारात आणलेल्या पतंजली नूडल्सचा परवाना बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. बोगस परवाना नूडल्सवर राज्य सरकार तत्परतेने कारवाई करावी असे सांगत मलिक यांनी भाजपला घेरले आहे.
बाबा रामदेव यांच्या पतंजलीने नुकत्याच बाजारात आणलेल्या नूडल्सला भारतीय खाद्य सुरक्षा व गुणवत्ता नियंत्रण प्राधिकरणाचा बोगस परवाना मिळवला असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक म्हणाले, पतंजलीच्या नूडल्सला बोगस परवाना मिळाल्याची माहिती आमच्याकडे आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी याआधी जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी नेहमीच तत्परतेने कारवाई करण्याची काळजी दाखवलेली आहे. तशीच तत्परता ते पतंजलीच्या बोगस परवान्याच्या बाबतीत दाखवतील का, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने मॅगी नूडल्सला क्लिन चिट देऊन त्यावरील बंदी उठवली होती. तेव्हा गिरीश बापट यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची भाषा केली. पण त्यांचा हा निर्णय बाबा रामदेव यांच्या प्रभावाखाली घेतलेला असून पतंजलीच्या उत्पादनांना फायदा पोहोचवण्यासाठी आहे, असा आरोप मलिक यांनी केला होता. राष्ट्रवादीकडून केल्या गेलेल्या या आरोपाचा परिणाम म्हणूनच राज्य सरकारने मॅगी विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय रद्द केला आहे. आता पतंजलीच्या बोगस परवान्याबाबत देखील ते कारवाई करतील, अशी आशा नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
पुढे पाहा व वाचा, बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कशी केली आहे चोरी...