आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babanrao Gholap & Sanjay Mandlik Loksabha Contest From Shirdi & Kolhapur

शिवसेनेकडून शिर्डीतून बबनराव घोलप तर कोल्हापूरातून संजय मंडलिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने शिर्डी मतदारसंघातून शिवसेना उपनेते आमदार बबनराव घोलप आणि कोल्हापुरातून संजय मंडलिक यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेने पहिल्या यादीत 15 शिलेदारांची नावे जाहीर केल्यानंतर आज आणखी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
बबनराव घोलप हे देवळाली कॅम्प मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले असून 25 वर्षे ते आमदार आहेत. युती सरकारच्या काळात ते समाजकल्याण मंत्रीही होते. संजय मंडलिक हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असून अनेक शैक्षणिक आणि सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.