मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या २०१५ च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचे आभार मानतानाच खडे बोलही सुनावले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या दीर्घकालीन कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना २०१५ च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली. यासंदर्भात विविध स्तरावरून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सरकारच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे. यासोबतच त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीकाही केली आहे. राज्य सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्यात एवढा उशीर का केला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकारला उशिरा जाग आल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.