आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबडवे गावात बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल - फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. त्यांच्या विचारांमुळे आजही देश एकसंध आहे. बाबासाहेबांच्या आंबडवे गावात होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित विचार महोत्सवात ते बोलत होते. आयडीबीआय बँकेचे चेअरमन किशोर खरात अध्यक्षस्थानी होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एस. स्थूल अादी उपस्थित हाेते. फडणवीस म्हणाले की, ‘देश एकसंध ठेवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मोठे योगदान आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीचे कार्य केले आहे. नदीजोड प्रकल्प व पाण्याच्या विकेंद्रीकरणाचे नियोजन या संकल्पना डॉ. आंबेडकरांनी त्या काळात मांडल्या. या प्रेरणादायी विचारांतून येणाऱ्या पिढीला सतत स्फूर्ती मिळावी यासाठी आंबडवे येथे होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करून भव्य स्मारक उभारण्यात येईल.

त्यासंबंधीचा आराखडा तयार करत आहोत. या गावाला जाण्यासाठी हाऊस बोट व जेटीची सोयही करण्यात येणार आहे. आंबडवे गावाजवळून मुंबई- गोवा महामार्गाचा एक मार्ग नेण्यास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे.’
बातम्या आणखी आहेत...