आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशिदींचा मालक अल्लाच, ती कुणालाही देता येऊ शकत नाही; सादिक यांना दिले ओवैसींनी उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिया वक्फ बोर्डाने 8 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सांगितले होते की, मशिद विवादास्पद जागेपासून काही अंतरावर मुस्लिमबहूल भागात बांधता येऊ शकते. - Divya Marathi
शिया वक्फ बोर्डाने 8 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सांगितले होते की, मशिद विवादास्पद जागेपासून काही अंतरावर मुस्लिमबहूल भागात बांधता येऊ शकते.
मुंबई/हैदराबाद- शिया धर्मगुरु आणि इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष कल्बे सादिक यांच्या मुंबईतील वक्तव्यावर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मशिदींचा मालक अल्लाच असतो ती कुणालाही देता येऊ शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.  
 
- ओवैसी म्हणाले, मशिदींची देखरेख करण्याचे काम शिया, सुन्नी, बरेलवी, सूफी, देवबंदी, सलाफी, बोहरी करु शकतात. पण ते त्याचे मालक होऊ शकत नाहीत. कारण त्याचा मालक केवळ अल्लाह आहे.
- मशिदी केवळ एका मौलानाने सांगितले म्हणून देता येऊ शकत नाहीत. एकदा मशीद असल्यास ती कायम तशीच राहते. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डसुध्दा एखादी मशीद कुणाला सोपवू शकत नाही.
 
शिया बोर्डाने सुप्रीम कोर्टात काय म्हटले होते
- सुप्रीम कोर्टात शिया बोर्डाने सांगितले होते की, त्यांना न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. निकाल काहीही आला तरी त्याचा सन्मान राखण्यात येईल. विवादित जमीन सोडण्याची तयारीही शिया बोर्डाने दर्शवली. 
- विवादित जमीन हिंदूंना मिळाल्यास कोट्यावधी मने आमच्यासोबत येतील. हा हिंदू-मुस्लिमांचा प्रश्न नसून देशाचा मुद्दा आहे.
बातम्या आणखी आहेत...