आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत कचरा कुंडीत आढळली चार दिवसांची चिमुरडी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील सांताक्रूजच्या मिलन सबवेला मातृत्त्वाला काळिमा फासणारा घटना उघडकीस आली आहे. एका निष्ठूर माता तिचे चार दिवसांचे बाळ कचरा कुंडीत टाकून पसार झाली आहे. चार दिवसांच्या या कोवळ्या जीवावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सांताक्रूज मिलन सबवेवर गुरूवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास कचरा कुंटीतून बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. आजुबाजुच्या लोकांनी कचरा कुंडीत डोकावून पाहिले असता त्यात एका कपड्यात बाळ गुंडाळलेले आढळून आले. त्यानंतर त्यांनी बाळाला उचलून तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सध्या हे बाळ सायन रुग्णालयात आहे. पोलिस या बाळाच्या आईचा शोध घेत आहेत.