आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम असताना प्रस्थापित झालेले शारीरिक संबंध, त्यानंतर बलात्कार ठरणार नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल देताना सांगितले आहे, की प्रेम संबंध असताना प्रस्थापित झालेल्या शारीरिक संबंधांना प्रेम संबंध संपुष्टात आल्यावर बलात्कार म्हणता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश साधना जाधव यांनी अशाच एका प्रकरणी बोरीवली येथील ३९ वर्षिय कोटियान याला मुक्त केले आहे.

कोटियान याच्यावर त्याच्या माजी प्रेमिकेने बलात्काराचा आरोप केला होता. यासंदर्भात निकाल देताना साधना जाधव म्हणाल्या, की आरोपीसोबत प्रेम संबंध असल्याचे फिर्यादी युवतीने मान्य केले आहे. त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती, असेही युवतीने म्हटले आहे. त्यामुळे कलम ३७६ अंतर्गत याला बलात्काराचे प्रकरण म्हणता येणार नाही. आरोपीने युवतीला प्रपोज केले होते.

अधिक माहितीसाठी पुढील स्लाईड बघा