आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबई, नागपूर, नाशिकचा समावेश; या 17 शहरामधील हवा दूषित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईसह नागपूर आणि नाशिकचा समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात हे समोर आले आहे. देशातील प्रदूषित 123 शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिकसह 17 शहरांचा समावेश आहे.

शहरी भागातील प्रदुषण नियंत्रणासाठी विविध उपायोजना करून 2022 प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न करावा, असे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी केले. पोटे पाटील काल (मंगळवार) ‘शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र- 2022’ विषयावर झालेल्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.  

पर्यावरण विभागामार्फत शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र 2022 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष एस.पी.एस परिहार, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, आयआयटी मुंबईचे प्रा. वीरेंद्र शेटी, विविध महानगरपालिकेचे महापौर, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ. पी. अनबलगण आदी उपस्थित होते.

पोटे पाटील म्हणाले की, महापालिकांनी 25 टक्के निधी हा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी खर्च करावा. जिलाधिकारी, महापालिका आयुक्त आणि महापौर यांनी प्रयत्न करायला हवे. सामान्य जनतेत पर्यावरणाबाबत जनगागृती करणे गरजेचे आहे. राज्यातील मोठ्या शहरात वाहने आणि कारखानदारीमुळे प्रदूषणात वाढ होते, असे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई म्हणाले. नव्या पीढीला शुद्ध हवा आणि पाणी उपलब्ध करून देण्याचे आपले कर्तव्य आहे.

पुढील स्लाइवर वाचा... राज्यातील या 17 शहरातील हवा सर्वात प्रदूषित...
बातम्या आणखी आहेत...