आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता राम कपूर विरोधात फसवणुकीचा गुन्हा; कर्जाच्या पैशातून भरले क्रेटिट कार्डचे बिल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- छोट्या पडद्यावरील मालिका ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेता राम कपूर विरोधात मुंबईतील एका कोर्टात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलाब्यातील ‘मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी’ या कंपनीनी राम कपूर विरोधात खटला भराला आहे.

रामने ऑगस्ट 2016 मध्ये  मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी या कंपनीकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. महिन्याभरात 24 टक्के व्याज दराने ही रक्कम तो फेडणार होता. मात्र ठरल्याप्रमाणे वर्षभरानंतरही 35 लाखांची रक्कम परत केले नाही. परिणामी कंपनीने राम कपूरविरोधात कायदेशीर तक्रार नोंदवली आहे.

कर्जाच्या पैशातून भरले क्रेटिट कार्डचे बिल...
- अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्डाची थकबाकी भरण्यासाठी रामने तातडीने पैसे उसने घेतल्यचे ‘मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी’ने म्हटले आहे.
- अप्रामाणिक हेतूने रामने फसवणूक केल्याचा दावा कंपनीने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...