आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Badlapurladysuicide With His 4 Year Old Boy From 7th Floor Building

चार वर्षाच्‍या चिमुकल्‍यासह मातेची सातव्‍या मजल्‍यावरून उडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उषाबेन यांचा मृतदेह - Divya Marathi
उषाबेन यांचा मृतदेह
बदलापूर – येथील बेलवली भागातील ग्रीन लॉन्स या कॉम्प्लेक्समध्ये एका मातेने आपल्‍या चार वर्षीय मुलासह सातव्‍या मजल्‍यावरून उडी मारून आत्‍महत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना सोमवारी सकाळी 10 वाजताच्‍या सुमारास घडली. उषाबेन जाडेज्या आणि मुलगा अजय अशी मृतांची नावं आहेत.
उषाबेन या आपला मुलगा अजय याला क्लाससाठी घेऊन जाते असे म्हणून घरातून बाहेर पडल्या, मात्र त्या अजयला क्लासला घेऊन न जाता आपल्या सात मजली इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेल्या आणि तिथूनच त्यांनी मुलगा अजयसह खाली उडी मारली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली असून, आत्‍महत्‍येचे नेमके कारण कळू शकले नाही.