आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानाप्रमाणे सभागृहात राष्ट्रध्वज हाताळू नये, विधानसभा अध्यक्ष बागडे यांची अामदारांना समज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रध्वज हाताळण्याचे काही नियम आहेत. त्या नियमानुसारच राष्ट्रध्वज हाताळला पाहिजे. क्रिकेटच्या मैदानावर ज्याप्रमाणे राष्ट्रध्वज हाताळले जातात त्या पद्धतीने सभागृहात राष्ट्रध्वज हाताळू नये, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी सभागृहात दिले.

सोमवारी सकाळी विरोधी आमदार सभागृहात राष्ट्रध्वज घेऊन आले होते. त्यावर काही सदस्यांनी राष्ट्रध्वजाने तोंड पुसले, ताे पिशवीसारखा वागवला अशी व्हिडिअाे क्लीप साेशल मीडियावर फिरत असल्याचे अाशिष शेलार यांनी सांगितले. अशा सदस्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला. यावर अध्यक्षांनी म्हटले, ‘क्रिकेटच्या मैदानावर कशाही प्रकारे राष्ट्रध्वज हाताळला जातो. मात्र, आमदार जबाबदार असतात व सभागृहात राष्ट्रध्वज आणताना काळजी घेतली पाहिजे. सभागृहात
आमदारांनी राष्ट्रध्वज कशा प्रकारे हाताळला याची माहिती घेऊन मंगळवारी निर्णय दिला जाईल.’
राज्य घटनेने चालणार की संघाने : चव्हाण
‘ज्यांना संविधानाबद्दल व राष्ट्रध्वजाबद्दल आदर नाही त्यांनी देशप्रेमाच्या बाता मारू नयेत,’ अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली हाेती. त्यावर सत्ताधाऱ्यांनी गाेंधळ घातला. त्यामुळे तालिका अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले. नंतर काँग्रेसचे नसीम खान व पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्याच्या माफीनाम्याची मागणी लावून धरली. हे राज्य घटनेच्या अाधारे चालणार की संघ चालवणार याचे उत्तर द्यावे, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.’
अामदारांनी उलटा ध्वज फडकावल्याची तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी सभागृहात राष्ट्रध्वज उलटा फडकावल्याचा अाराेप करत या दोन्ही सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. त्यामुळे विराेधक संतापले. मात्र, ‘त्या वेळचे चित्रीकरण पाहून काय कारवाई करायची याचा निर्णय आपण घेऊ,’ असे आश्वासन तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी दिले.
देशभक्ती तुम्ही शिकवू नका : नितेश राणे
नितेश राणेंनी ध्वज उलटा फडकावल्याचे आपल्याला सांगण्यात अाले अाहे, असे तालिका अध्यक्ष योगेश सागर म्हणाले. त्यावर राणे संतापले. ‘आपले नाव नाहक गोवण्यात येत अाहे,’ असे सांगताना ‘देशभक्ती तुम्ही आम्हाला शिकवणार का, असा उद्विग्न सवाल त्यांनी सागर यांना उद्देशून केला. त्यावर सागर म्हणाले की, ‘मिळालेल्या माहितीच्या अाधारे अापण राणेंचे नाव घेतले. मात्र, त्यांनी ध्वज उलटा फडकावला नसेल तर मी वक्तव्य कामकाजातून काढून टाकताे.’