आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबलीने घडवला नवा इतिहास, 1000 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला भारतीय चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  रजनीकांत, आमिर, सलमान आणि शाहरुखच्या विक्रमांच्या एका पोठोपाठ -एक चिंधळ्या उडवणाऱ्या बाहुबली-2 ने नवा इतिहास घडवला आहे. देश, परदेशात केवळ 10 दिवसांमध्ये 1000 कोटींहून अधिकची कमाई करून बाहुबली-2 ने भारतीय सिनेसृष्टीत कमाईचे सर्व विक्रम मोडीस काढले. पहिल्याच आठवड्यात 860 कोटींची कमाई करणाऱ्या हा चित्रपट 1000 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. 
 
जादुई आकडा पार करणाऱ्या बाहुबली-2 ने आमिर खानच्या दंगल चित्रपटाच्या कमाईचा विक्रम 7 दिवसांतच मोडला. चित्रपट क्षेत्रातील जाणकारांनी बाहुबली-2 ने हजार कोटींचा आकडा पार केल्याची माहिती दिली. यासोबतच करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शनने सुद्धा रविवारी ट्वीट करून या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...