आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bahujan Samaj Party News In Marathi, Lok Sabha Election 2014, Divya Marathi

बसपाने राज्यातील लोकसभा उमेदवारांची यादी केली जाहीर, मुंबईतून चाटे लढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने राज्यातील सात उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. त्यात मराठवाड्यातील उद्योजक मच्छिंद्र चाटे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असून त्यांना उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली आहे.


चाटे यांनी यापूर्वी आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठीही प्रयत्न केले. परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने ‘आप’ने उमेदवारी देण्यास नकार दिला. त्यानंतर चाटे यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी देत बसपत प्रवेश केला.
बसप राज्यातील सर्वच 48 जागा लढवणार असून विदर्भात पक्षाचा मोठा जनाधार आहे. त्यामुळे विदर्भातील उमेदवारांची यादी घोषीत करण्यास विलंब होत असून दुसरी यादी सोमवारी घोषीत केली जाणार असल्याची माहिती गरुड यांनी दिली.


उमेदवारांची यादी : उत्तर पूर्व मुंबई- मच्छिंद्र चाटे, उत्तर पश्चिम मुंबई-पुष्पा भोळे, दक्षिण मध्य मुंबई -अ‍ॅड. गणेश अय्यर, उत्तर मुंबई - अशोक सिंग, लातूर-दिपक कांबळे, नांदेड-हबीब शेख, नाशिक -दिनकर पाटील असे आहेत.

चाटेंना क्लीन चिट : चाटे यांच्यावर मुंबईत विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची बाब पत्रकारांनी उपस्थित केली. त्यावर ‘ती तक्रार क्लासेसच्या स्पर्धेतील आकसातून नोंदवली होती,’ असे सांगत बसपचे राज्य प्रभारी आणि खासदार विरसिंह यांनी चाटे यांना क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला.