Home »Maharashtra »Mumbai» Bail To Sandip Deshpande And Mns Workers

काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या संदीप देशपांडेंसह MNS कार्यकर्त्यांना जामीन

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 15:09 PM IST

मुंबई- आझाद मैदानातील काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीसंदर्भात अटक झालेल्या मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह आठ जणांना जामीन मिळाला आहे. सध्या हे सर्व जण आर्थर रोड कारागृहात आहेत.


मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरीश सोलंकी आणि दिवाकर पडवळ यांच्यावर दंगल माजवणे, विनापरवानगी एखाद्याच्या खासगी मालमत्तेत प्रवेश करणे, मालमत्तेचे नुकसान आणि नासधूस करणे यासारखे आरोप आहेत.

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended