आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Bajarangi And Bahubali' Both Earn 600 Crore With In 15 Days

दिव्य मराठी विशेषः बजरंगी-बाहुबलीचा ६०० कोटींचा गल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मल्टिप्लेक्सचे तिकीट २०० असो वा ५०० रुपये, प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी पैशांकडे पाहत नाहीत... हे या वर्षीच्या पहिल्या सात महिन्यांत दिसून आले. गेल्या ७ महिन्यात आलेल्या चित्रपटांसाठी प्रेक्षकांनी सुमारे हजार कोटी रुपये तिकीटबारीवर उडवले आहेत. इतकेच नव्हे तर बाहुबली व बजरंगी भाईजान या दोन चित्रपटांनी १५ दिवसांत ६०० कोटींचा गल्ला गोळा केला आहे. बाहुबलीच्या वितरकांना आतापर्यंत १०० कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती बॉलीवूडमधील सूत्रांनी दिली.
केवळ तिकीटच नव्हे तर पार्किंग व खाण्यापिण्यावरही प्रेक्षकांनी भरपूर खर्च केला. एका कारला कमीत कमी ३० रुपये पार्किंग चार्ज आणि तीन जणांचे कुटुंब असेल तर पॉपकॉर्न, समोसा, कोल्डड्रिंकवर साधारण ५०० रुपये खर्च होतात. सिंगल स्क्रीनमध्ये चहा, समोशावर प्रतिव्यक्ती साधारण ५० रुपये खर्च होतात.हा सगळा खर्चही कोट्यवधीमध्ये गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाहुबली : ४०१ कोटी
१० जुलैला सुमारे ४२०० चित्रपटगृहांत बाहुबली प्रदर्शित झाला. त्याने पहिल्याच आठवड्यात २२५ कोटी कमावले. केवळ १५ दिवसांत त्याने ४०१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सर्वात कमी दिवसांत ४०० कोटींचा टप्पा गाठणारा बाहुबली हा पहिला भारतीय चित्रपट आहे. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला गोळा करत असून तो पीकेचा ७४० कोटी रुपयांचा विक्रम मोडू शकतो.
बजरंगी भाईजान : २००
बाहुबलीनंतर एकाच आठवड्यानंतर प्रदर्शित झालेल्या बजरंगी भाईजानवरही प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. ५ हजारपेक्षा जास्त चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ दोन आठवड्यात २०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. अजूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल जात असून नवा कोणताही मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने बजरंगीसाठी तिकीटबारीचे
मैदान मोकळेच आहे.