आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉटस्‌अॅपला घाबरला ‘बजरंगी भाईजान’; पोलिसांत दिली तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई – या ना त्‍या कारणाने नेहमीच चर्चेत असलेले सल्‍लू मियॉ ऊर्फ ‘बजरंगी भाईजान’ हे व्हॉटस्‌अॅपवरील मॅसेजला घाबरले आहेत. आपल्‍या आगामी चित्रपटाविषयी काही जण उगाचच चुकीची माहिती पसरवून चाहत्‍यांमध्‍ये संभ्रम निर्माण करत असल्‍याचा आरोप त्‍याने केला आहे. शिवाय या प्रकरणी थेट मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली.
सल्‍लू मियाने म्‍हटले, ‘‘ एआयएमआयएमचे नेते ओवैसी आणि मुस्लिम चाहत्यांच्या समर्थनाशिवाय ‘बजरंगी भाईजान‘ हा आगामी चित्रपट हिट होईल आणि या चित्रपटाचे ‘खान भाईजान‘ हे नाव बदलून ‘बजरंगी भाईजान‘ ठेवण्यात आले, असे वक्‍तव्‍य आपण केल्‍याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे’’, असा आरोप त्‍याने तक्रारीत केला. सल्‍लूच्‍या या तक्रारीची चौकशी सुरू असल्‍याची माहिती पोलिस प्रवक्ते तथा उपायुक्त (गुन्हे) धनंजय कुलकर्णी यांनी दिली.