आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांच्या 100 कोटींच्या संपत्तीवरून उद्धव-जयदेव बंधूंत वाद, प्रकरण कोर्टात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आता त्यांच्या 100 कोटींपेक्षा अधिक असलेल्या संपत्तीवरून कौटुंबिक कलह चर्चेत आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदास आणि धाकटे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पक्षातील चार वरिष्ठ नेत्यांना सोबत घेऊन मुंबई हायकोर्टात मृत्यूपत्र सादर करीत एक याचिका दाखल केली आहे. अशा प्रकारची याचिका दिवंगत व्यक्तीच्या इच्छेनुसार संपत्तीचे वाटप किंवा अधिकार बहाल (मृत्यूपत्र) करण्याबाबतची असते. या याचिकेत म्हटले आहे, की ही सारी संपत्ती बाळासाहेब यांनी उद्धव यांना बहाल केली आहे. मात्र, बाळासाहेबांचे थोरले चिरंजीव जयदेव यांनी यास विरोध केला आहे. या मृत्यूपत्रावर बाळासाहेब यांची सही नसल्याचे जयदेव यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, उद्धव यांनी म्हटले आहे, की बॅंक डिपॉजिट आणि इतर संपत्तीचे मूल्य सुमारे 14.85 कोटी आहे. मात्र जयदेव यांचे म्हणणे आहे, की मातोश्री या बंगल्याचीच किंमत 40 कोटींच्या घरात आहे. बाकी संपत्ती, दागिने व बॅंक डिपॉजिट मिळून ही एकूण संपत्ती 100 कोटींच्या घरात आहे. उद्धव व सेनेच्या नेत्यांनी कोर्टात दाखल केलेल्या मृत्यूपत्रानुसार, जयदेव यांच्यासह बाळासाहेब यांचा दिवंगत मुलगा बिंदूमाधव यांच्या कुटुंबियांचा संपत्तीत अधिकार नाही.
पुढे वाचा, काय आणि कसा आहे ठाकरे कुटुंबातील संपत्तीचा वाद...