आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना डिस्चार्ज, प्रकृती स्थिर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ जुलैला श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यांच्यावर एन्डोस्कोपी करावी लागणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, डॉक्टरांनी एन्‍डोस्कोपी करण्याचे टाळले आणि आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सायंकाळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे लीलावतीत दाखल झाले. ते स्वतः त्यांना 'मातोश्री'वर घेऊन गेले.
बाळासाहेब लवकर बरे व्हावेत यासाठी शिवसैनिकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. बाळासाहेबांना डिस्चार्ज मिळाल्यामुळे शिवसैनिकांना आनंद झाला आहे.
बाळासाहेब ठाकरेंना श्‍वसनाचा त्रास, लीलावती रुग्‍णालयात दाखल
बाळासाहेब-उद्धव-राज आणि कॉफीची मैफल
मनमोहनसिंग जागतिक पातळीवरील हास्यास्पद प्राणी- बाळासाहेब ठाकरे