आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bal Thackeray, Sachin Among Water Bill Defaulters In Mumbai

बाळासाहेब ठाकरेंसह सचिन तेंडुलकरचे नाव डिफॉल्टर्सच्या यादीत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बृहन्मुंबई महापालिकेने (बीएमसी) पाणीपट्टी थकविणार्‍या डिफॉल्टर्सची यादी जाहीर केली आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

बृहन्मुंबई महापालिकेने सुमारे दोन लाख रुपयांची पाणीपट्टी थकविणार्‍या डिफॉल्टरर्सची यादी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. धक्कादायक गोष्टी म्हणजे या यादीत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकर, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे नाव झळकले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर याने अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. शासनाच्या सामाजिक जाहीरातींमध्ये सहकार्य करण्याचे जाहीरही केले होते. उल्लेखनिय म्हणजे महापालिकेच्या जाहिरातीतून 'आपला' सचिन 'पाणी वाचवा' संदेश देतानाही दिसला होता. मात्र, मुंबईकरांना 'पाणी वाचवा' असा संदेश देणार्‍या सचिननेच पाण्याचे बील थकविल्याचे समोर आल्याने मोठा धक्का बसला आहे.

स्थायी समितीने एकूण 9192 पानी थकबाकीदारांची यादी जाहीर केल‍ी असून 16 जानेवारी, 2014 पर्यंत सुमारे दोन लाख उपभोक्त्यांकडे एक हजार कोटी रुपये थकीत आहे.
राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी गेल्या महिन्यात महापालिकाचे आयुक्त सीताराम कुंटे यांना डिफॉल्टर्सची यादी जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही यादी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.